अबब.... राजकीय नेत्यांची संपत्ती वाढली तिपट्टीने...

सामान्य माणसाचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात वाढले असेलच असे नाही. राजकारण हे समाजकारण म्हणत राजकारणातील मलिदा खाणाऱ्या नेत्यांचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुपट्टी किंवा तिपटीने वाढले आहे. 

Updated: Sep 28, 2014, 03:05 PM IST
अबब.... राजकीय नेत्यांची संपत्ती वाढली तिपट्टीने...  title=

मुंबई : सामान्य माणसाचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात वाढले असेलच असे नाही. राजकारण हे समाजकारण म्हणत राजकारणातील मलिदा खाणाऱ्या नेत्यांचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुपट्टी किंवा तिपटीने वाढले आहे. 

या यादीत भाजपचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती पाच वर्षांपूर्वी ६८ कोटी रुपये होती आता ती २०० कोटी रुपये झाली आहे. म्हणजे ही संपत्ती तिप्पट झाली आहे. अजित पवारांची संपत्तीही तिपट्टीने वाढली आहे. 

पाहू या आपल्या नेत्यांची वाढलेली संपत्ती आणि ही फक्त त्यांनी जाहीर केली आहे... बाकीचे तुम्ही सुजाण आहेत सर्व जाणतात... 

नाव

वर्ष २००९

वर्ष २०१४

पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)  

 

१३ कोटी    

अजित पवार (राष्ट्रवादी)

१०.८ कोटी 

३७.९३ कोटी

मंगलप्रभात लोढा(भाजप)       

६८ कोटी

२०० कोटी

प्रशांत ठाकूर (भाजप)  

 

५८ कोटी 

राम कदम (भाजप)  

१३ कोटी  

३९ कोटी   

नारायण राणे (काँग्रेस) 

१३ कोटी 

२३ कोटी 

छगन भुजबळ (राष्ट्रवादी) 

७.७ कोटी

२३ कोटी

सतेज पाटील   (काँग्रेस)     

४.३ कोटी 

२३ कोटी 

देवेंद्र फडणवीस (भाजप)

१.९ कोटी 

४.४ कोटी 

सुधीर मुनगंटीवार (भाजप)

६३ लाख 

३.२ कोटी

राजेश टोपे (राष्ट्रवादी) 

५ कोटी 

३९ कोटी

नितेश राणे (काँग्रेस)

 

११.८ कोटी

अमीन पटेल (काँग्रेस)         

१३.२ कोटी  

३७ कोटी

प्रकाश मेहता(भाजप)   

१८ कोटी

३२ कोटी   

सचिन अहिर (राष्ट्रवादी)

७.९ कोटी 

१७.५ कोटी

प्रताप सरनाईक(शिवसेना)  

१६ कोटी 

२५ कोटी

एकनाथ शिंदे (शिवसेना)

१.२ कोटी 

 ६.५ कोटी

सरदार तारा सिंह (भाजप) 

११ कोटी 

१८ कोटी

कृपाशंकर सिंह (काँग्रेस) 

८० लाख  

३.२ कोटी

वर्षा गायकवाड (काँग्रेस)

६२ लाख

 ३.१ कोटी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.