तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा - राज ठाकरे

मुंबईकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली, तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहणार, असा इशारा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत दिला आहे.

Updated: Oct 6, 2014, 12:25 PM IST
तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा - राज ठाकरे title=

मुंबई : मुंबईकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली, तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहणार, असा इशारा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत दिला आहे.

पालघरचं कोस्ट गार्ड रद्द करून मोदींनी पोरबंदरला हलवलं, हा भेदभाव निर्माण केला जात आहे, तो कदापी सहन केला जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

जपानला जाऊन म्हणाले, बुलेट ट्रेन काढणार, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कशासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. 

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मराठी माणसं तर वापरणार नाहीत. मग काय अहमदाबादला जाऊन, ढोकळा खाऊन, रिटर्न तिकीट काढून परत यायचं काय, करायचंय काय बुलेट ट्रेनचं? असा दुसरा सवालही राज ठाकरेंनी केला.

भाजपकडे मोदींशिवाय दुसरा चेहरा राहिलेला नाही, अशी टीकाही यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.