विधानसभा २०१४ : राज ठाकरेंची आज पहिली सभा

मनसे आपल्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतून फोडणार आहे. कांदिवलीत सायंकाळी ६ वाजता मनसेची पहिली विधान सभा निवडणूक प्रचारसभा राज ठाकरे घेणार आहेत.

Updated: Sep 28, 2014, 12:19 PM IST
विधानसभा २०१४ : राज ठाकरेंची आज पहिली सभा title=

मुंबई : मनसे आपल्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतून फोडणार आहे. कांदिवलीत सायंकाळी ६ वाजता मनसेची पहिली विधान सभा निवडणूक प्रचारसभा राज ठाकरे घेणार आहेत.

युती तुटल्यानंतर शिवसेना मनसेसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा दोन दिवसांपूर्वी झाली होती. याविषयी राज ठाकरे काय बोलणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या विकासाची आपली काय कल्पना आहे, याची ब्लू प्रिन्ट सादर केली, या विकासकामांची कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपली भूमिका असणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.