नागपूर : नागपूरमध्ये मतदानाला गालबोट लागले आहे. भाजपकडून पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप मनसेनेने केला आहे. यावरुन भाजप-मनसे यांच्यात राडा झाला.
दरम्यान, सावनेर इथल्या पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नागपुरात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडल्याने थोडासा तणाव होता. नागपुरमधील झिंगाबाई टाकळी परिसरात ही घटना घडली. भाजपने पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप आहे. नागपूर पश्चिम भागात हाणामारी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.