आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार, आर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस राजी नसल्याचे दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार शरद पवार यांनी केला. त्याचवेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वक्तव्याची निंदा केली. महिलांविषयी वक्तव्य निंदनिय आहे, असे पवार म्हणाले. 

Updated: Oct 12, 2014, 01:08 PM IST
आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार, आर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार title=

मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस राजी नसल्याचे दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार शरद पवार यांनी केला. त्याचवेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वक्तव्याची निंदा केली. महिलांविषयी वक्तव्य निंदनिय आहे, असे पवार म्हणाले. 

आपल्या ही निवडणूक शेवटी असल्याचे संकेत शरद पवार यांनी यावेळी दिले. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेण्याची एकप्रकारे संकेत दिले आहे. आतापर्यंत ७ निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली लढल्या असल्याचे सांगितले. ही निवडणूक परीक्षा असल्याचे ते म्हणालेत. परीक्षा दिली आहे. यापूर्वी लेखी पेपरसाठी ६० तर प्रँक्टीकलसाठी ४० मार्क मिळायचे होते. आता तीच परीस्थिती आहे. प्रचार संपालय त्यामुळे प्रँक्टीकलसाठी ४० मार्क मिळायचे आहे. बघुया काय होते ते, असे पवार म्हणाले.

भाजप ऐक्य तोडतोय
- महाराष्ट्राच्या ऐक्यासंदर्भात भाजपची वेगळी भूमिका
- महाराष्ट्र एकसंघ राहावा ही राष्ट्रवादीची भूमिका
- विदर्भाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कौल घ्यावा
- त्या मतदानाचा आदर राष्ट्रवादी करेल.

थांबण्याचा निर्णय
- नवीन पिढीनं जबाबदारी घेतली आहे.
- शरद पवार कोणतंही नेतृत्व स्विकारणार नाही
- मी थांबायचा निर्णय घेतलीय

महारांच्या नावासोबत मोदींचे नाव जोडले
- लोकांमध्ये तीव्र भावना आहेत
- शिवाजी महारांच्या नावासोबत मोदी यांचं नाव दिलं गेलंय.
- मोदींनी छत्रपती शिवाजी यांच्या नावाचं वापर केलाय
- दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे आजोबा होते हे चुकीचे 
- गुजरात सरकारनं सातवीचा इतिहास चुकीचा लिहला

उद्धव यांचे कौतुक
- कष्ट करण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे 
- शिवसेना पक्ष वाढीची चिंता उद्धवने ठेवली नाही

मोदींकडून यंत्रणेचा गैरवापर
- याचे निवडणुकीत प्रचारासाठी भांडवलं केलं. हा वापर चुकीचा
- ते देशाचे पंतप्रधान म्हणून बोलले.  
- हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर आहे
- मोदींनी मेडीसनच्या भाषणाची जाहीरात केली
 
चव्हाणांवर टीका 
- राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होती तर पृथ्वीराज चव्हाण सत्तेच्या खुर्चीवर का बसले?
- शरद पवार यांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका 

तिसरी आघाडी, विचार करू
- माझी देवेगौडा यांची भेट झाली नाही
- पण तिसरी आघाडी संदर्भात अद्याप विचार नाही
- पण पुढे विषय आला तर गांभीर्यानं विचार करू 

 पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- त्यांनी माफी मागितलेय, या विषयावर आता चर्चा नको
- महिलांविषयी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे.
- आर. आर. पाटील यांचे वक्तव्य निंदनीय आहे - पवार
- राष्ट्रवादीची १२५ ते १३० जागांसाठी आग्रही होतो.
- काँग्रेसने उमेदवारांची घोषणा करुन आघाडीत बिघाडी झाली
- त्यात ५०टक्के जागा देण्याची मागणी केली
- ५० टक्के मिळावी अशी अपेक्षा नव्हती
- १२५जागा मिळण्याची अपेक्षा होती
- काँग्रेसनं सहकार्य केलं नाही
- १२५ जागांची तयारी आमची होती
- आघाडी झाली नसल्यामुळे राष्ट्रवादीला २८८ जागांवर लढावं लागलं.
- शरद पवार यांनी आघाडी तुटण्यासाठी काँग्रेसला जबाबदार ठरवले
- भाजप आणि काँग्रेस यांचे सर्व जागा लढवण्याची तयारी होती
- मतदार अधिक शहाणा आहे म्हणूनच लोकशाही टिकली
- मतदार गोंधळलेला आहे, हे मला मंजूर नाही
- मतदार आपली स्वच्छ भूमिका या निवडणुकीत मांडेल
- स्थिरता व दूरदृष्टी याबद्दल मतदार निर्णय घेईल . 
- मतदार शहाणा आहे. तो लोकशाही टिकवून आहे.
- मतदार गोंधळलेला नाही, तो राज्याच्या हिताचा निर्णय घेईल
- या वेळची निवडणूक वेगळी आहे 
- मी सात निवडणुका पाहिल्या आहेत.
- आता प्रँक्टीकलचे ४०मार्क जनता देईल
- आम्ही महाराष्ट्रात फिरून ६० मार्क मिळवले
- यापूर्वी लेखी पेपरसाठी ६० तर प्रँक्टीकलसाठी ४० मार्क मिळायचे
- आता माझे 7 पेपर संपले
- उद्याचा पेपर झाला निकाल लागला की संपलं
- ही निवडणूक महाविद्यालयीन परीक्षेप्रमाणे आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.