सेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक

आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईत भरदिवसा एका राजकीय नेत्याची त्याच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आलीय. 

Updated: Oct 21, 2014, 11:31 PM IST
सेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक title=

मुंबई : आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईत भरदिवसा एका राजकीय नेत्याची त्याच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आलीय. 

मुंबईतल्या मालाड खोत डोंगरी प्रभाग 40 मधील शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आलीय. जाधव यांच्या दिंडोशी इथल्या राहत्या घरात घुसून धारदार शस्त्रानं ही हत्या करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी 6.30 ते 7.00 च्या सुमारास ही घटना घडली. राजकीय वैमनस्यातून रमेश जाधव यांची हत्या झाल्याचा संशय आहे. 

या हत्येनंतर शिवसैनिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. संतप्त कार्यकर्त्यांनी बराच काळ वेस्टर्न हायवे जाम केला होता. मारेकऱ्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत त्यांनी हायवेवर दगड आणि बॅरिकेडस टाकून रस्ता रोखून धरला. यावेळी, बस आणि टेम्पोची तोडफोडही करण्यात आली. परंतु, पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.