'पवारांना एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे'

शरद पवारांना लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे, मी आणि गोपीनाथरावांनी विरोध केला, त्यामुळे शरद पवारांना एनडीएमध्ये घेता आलं नाही, यासाठी माझ्याकडे अनेक साक्षी आहेत, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केला आहे.

Updated: Oct 8, 2014, 03:24 PM IST
'पवारांना एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे' title=

औरंगाबाद : शरद पवारांना लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये घ्यायचं होतं, हे सत्य आहे, मी आणि गोपीनाथरावांनी विरोध केला, त्यामुळे शरद पवारांना एनडीएमध्ये घेता आलं नाही, यासाठी माझ्याकडे अनेक साक्षी आहेत, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केला आहे.

मी टोपी फेकलीय, माझ्या फेकलेल्या टोपीत डोकं घालेल तो अफझल खान, तुम्ही का डोकं घालता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. दिल्लीहून अफझल खानाची फौज आली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता, यावर भाजप नेत्यांनी अफझल खानाच्या मंत्रिमंडळात कसे राहता असा सवाल केला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी २७ वर्ष लढला तरी त्याला ते शक्य झालं नाही, असं उदाहरण देखिल उद्धव ठाकरे यांनी दिलं.

संकटकाळी शिवसैनिक माझ्याबरोबर राहिला आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा माझं नातं शिवसैनिकांशी घट्ट आहे, आणि त्यांच्यासाठी कमी जागा घेऊन मी काय कमावलं असतं, तुमची दिल्लीची मस्ती दिल्लीत, दिल्लीची मस्ती माझ्याकडे चालणार नाही, असं परखड शब्दात भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांच्या पापावर पांघरूण का घातलं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सवाल यांना केला आहे. तसेच आमच्याबरोबर संभाजीनगर म्हणणारे, आता औरंगाबाद का म्हणायला लागले?, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आमचं हिंदुत्व मुसलमानांच्या विरोधात नाही तर देशाविरोधात कट करणाऱ्यांविरोधात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.