विदर्भावर परस्परविरोधी भूमिका का? - राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कांदिवलीत आज मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी आज सकाळी सभेत महाराष्ट्र अखंड ठेवण्याबद्दल बोलले आणि त्यांचेच नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचं सांगितलं, यांचीच विरोधी भूमिका? , असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Updated: Oct 8, 2014, 03:25 PM IST
विदर्भावर परस्परविरोधी भूमिका का? - राज ठाकरेंचा सवाल title=

 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कांदिवलीत आज मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी आज सकाळी सभेत महाराष्ट्र अखंड ठेवण्याबद्दल बोलले आणि त्यांचेच नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचं सांगितलं, यांचीच विरोधी भूमिका? , असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

भाजपला उमेदवार सापडत नाही, आणि बहुमताची अपेक्षा करतात - राज ठाकरे
भाजपने जवळपास ६० उमेदवार बाहेरच्या पक्षातून आणले आहेत, तरीही स्वबळावर हे सत्ता आणण्याचं स्वप्न पाहाताय, यांना उमेदवार मिळत नाहीत, आणि स्वबळावर सत्ता कशी देणार यांना, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. यांना निवडून दिलं तर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आल्यासारखं होईल, असंही राज ठाकरे यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.

बाळासाहेबांच्या जीवावर महाराष्ट्रात भाजप उभं राहिलं - राज ठाकरे 
बाळासाहेबांच्या जीवावर भाजपाने मुंबईत पाय पसरवले, हे वाढले, नाहीतर कोण उभं करत नव्हतं यांना, माझ्याविषयी बोलले असते, तर दाखवलं असतं, ते ज्यांच्याविषयी बोलतायत ते भाजपशी युती तोडल्याचं सांगतात, मग मंत्रीपद कशाला ठेवलंय दिल्लीत, महापालिकेत का सत्ता हवीय तुम्हाला भाजप सोबत, ही सर्व यांची पैशाची गणितं असल्याचा आरोपही यावेळी राज ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीनं बिल्डर आणि कंत्राटदारांच्या ताब्यात दिलाय- राज ठाकरे
महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीने बिल्डरांच्या ताब्यात दिला आहे, झोपड्या उभारल्या जातात त्या झोपडवासीयांच्या हितासाठी नाहीत, तर बिल्डरांच्या हितासाठी, एसआरए उभारतात आणि  झोपडपट्टीवासीयांनाही तेथून बाहेर टाकतात, असा आरोप राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.