रत्नागिरी : विद्यमान कामगारमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स मानली जातेय. तर हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्याने भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - विजय भोसले
भाजप - डॉ. विनय नातू
काँग्रेस - संदीप सावंत
राष्ट्रवादी - भास्कर जाधव
राज्याच्या राजकीय पटलावर जे काही महत्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा एक विधानसभा मतदारसंघ मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेप्रमाणेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य या मतदारसंघाच्या निकालाकडं राहणार आहे.
गुहागरशी नातू कुटुंबीयांचा गेली तीन दशकांहून अधिक काळचा संबंध आहे. गेली 35 वर्ष गुहागरची आमदारकी ही नातू कुटुंबियांकडे होती. मात्र 2009 च्या विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेनेकडं गेल्यामुळे डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केली आणि त्याचा फायदा राष्ट्रावादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांना झाला.
जाधव यांनी या मतदारसंघात पाणीपुरवठा योजना, रस्ता विकास, समाजमंदिर , सभागृह, पिकअपशेड अशी विविध कामे केल्याचा दावा त्यांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका-यांनी केलाय.
गुहागरमध्ये रस्ते विकासाची कामे झाली मात्र कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय. गुहागरमधील आगामी विधानसभा निवडणुक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. मात्र जनतेच्या समस्या कायम आहेत.
- पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम
- पर्यटनाला चालना देण्यात अपयश
- गॅस एण्ड पॉवर प्रोजेक्ट बंद
- एमआयडीसी विषयी संभ्रम
- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून पर्यटनाला चालना देण्यात यश आलं नाही.
गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्ट बंद असल्यामुळे तिथल्या कामगारांवर बेकारीची वेळ आलीय. गुहागरमध्ये एमआयडीसी प्रकल्पाविषयी जनतेत संभ्रम आहे.
नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिलर तटकरेंना या मतदारसंघातून दोन हजार मताची आघाडी मिळाली होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.