ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - रिसोड

वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ... हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो. लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत 'मोदी लाट' थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखत अमित झनक यांना १२ हजार मतांनी विजयी केले. म्हणूनच रिसोडच्या राजकीय आखाड्यात विधानसभेचा रणसंग्राम कसा रंगतोय याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

Updated: Oct 8, 2014, 01:10 PM IST
 title=

अकोला : वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ... हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो. लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत 'मोदी लाट' थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखत अमित झनक यांना १२ हजार मतांनी विजयी केले. म्हणूनच रिसोडच्या राजकीय आखाड्यात विधानसभेचा रणसंग्राम कसा रंगतोय याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - विश्वनाथ सानप
भाजप - विजय जाधव
काँग्रेस - अमित झनक
राष्ट्रवादी - बबनराव पाटील
मनसे - राजू राजेपाटील
अपक्ष - शेख मणीभाई (भारिप)   

वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय संवेदनशील मतदारसंघ म्हणजे रिसोड... पूर्वी या मतदारसंघांची 'मेडशी' अशी ओळख  होती.... मात्र, २००९ मध्ये या मतदारसंघाला  'रिसोड' ही नवी ओळख मिळाली..तसेच हा मतदारसंघ अनुसुचीत जातीसाठी राखीव झाला. या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे..हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा अन 'झनक' घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो... रामराव झनक,सुभाष झनक यांच्यानंतर आता अमित झनक हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतायत. 
 
2009 मध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार आणि माजी मंत्री सुभाष झनक हे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला होता.  आमदार सुभाष झनक यांच्या अकस्मीत निधनानंतर नुकतेच इथं पोट निवडणूक झाली... या पोटनिवडणुकीत 'मोदी लाट' थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखली.. अमित झनक यांना या निवडणुकीत 73000 हजार मते मिळाली... त्याच्या विरोधात निवडणुक लढलेले भाजपचे विजय जाधव यांना 61000 मते मिळाली... या पोट निवडणुकीत अमित झनक यांना 12 हजारांचे मताधिक्य मिळाले

या मतदारसंघातील विकासाचा विचार करता... 
- लघु सिंचन प्रकल्प 
- वीज उपकेंद्र
- वाशिममध्ये जिल्हा रुग्णालय
- मालेगाव बायपास रोड
- रस्ते बांधणी

असे विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केलीय... आणि याच विकासकामावर आपण पुन्हा निवडणूक जिंकून येवू असा विश्वास झनक यांनी व्यक्ती केलीय. विद्यमान आमदारांकडून विकासकामांचा दावा केला जात असला तर रिसोड विधानसभा मतदारसंघातील काही समस्या आजही जैसे थे आहेत...

- ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
- सिंचन प्रकल्प रखडले
- एम.आय.डी.सी.ची दुरवस्था 
- सहकारी संस्था बंद 
- मालेगाव शहराचा विकास खुंटला
- ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत... विकासपातळीवर या मतदारसंघाची हि अवस्था असली तरी राजकीयपटलावर इथं हलचालींना वेग आला आहे... या मतदारसंघात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा पहायला मिळणार आहे. 
   
रिसोड मतदारसंघाचा विकास खुंटलेला असतांना राजकारण मात्र तापू लागलंय..आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आणि महायुतीत चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.