वांद्रे पश्चिम मतदार संघात भाजपची लागणार कसोटी

वांद्रे विधानसभा मतदार संघात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्धीकी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सगळ्या महाराष्ट्रात बहुमताची हाक देणा-या भाजपला मुंबईच्या अध्यक्षांना विजय मिळवून देण्यासाठी चांगली मेहनत करावी लागणार आहे. 

Updated: Oct 8, 2014, 01:05 PM IST
वांद्रे पश्चिम मतदार संघात भाजपची लागणार कसोटी title=

मुंबई : वांद्रे विधानसभा मतदार संघात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्धीकी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सगळ्या महाराष्ट्रात बहुमताची हाक देणा-या भाजपला मुंबईच्या अध्यक्षांना विजय मिळवून देण्यासाठी चांगली मेहनत करावी लागणार आहे. 

एकीकडे भारतीय चित्रपटसृष्टीतले झगमगते तारे आणि दुसरीकडे झोपडपट्टी, असं कॉम्बिनेशन असणारा वांद्रे मतदार संघ. या मतदार संघात यंदा उमेदवारांची संख्या १६ आहे. पण खरी लढत आहे ती काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्धीकी आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामध्ये.

गेल्यावेळेलाही या दोन उमेदवारांमध्ये चांगली जुंपली होती. पण शेलार यांना १९०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र वांद्रे मतदारसंघात भाजपच बाजी मारणार, असा दावा शेलार करत आहेत. 

या मतदारसंघात अल्पसंख्याक, ख्रिश्चन समाजाचे निर्णायक मतदान आहे. विद्यमान आमदार बाबा सिद्धीकी यांना गेल्यावेळेला अल्पसंख्याक समाजाची मतं मिळाली होती.  नर्गिस नगर झोपड्पट्टी भागातल्या मतदारांनी गेल्यावेळेला बाबा सिद्धीकींना अखेरच्या टप्प्यात लीड दिली होती. याच मतदाराच्या जीवांवर पुन्हा विजयी होऊ असं सिद्धीकींना वाटतंय. 

बाबा सिद्धीकी यांना काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास चावरे आणि मनसेचे तुषार आफळे या मतदारसंघातून रिंगणात आहेत. शेलार यांचं कृष्णकुंबरोबरचा स्नेह आहे. त्यामुळे शेलार यांना फायदा होईल, असं म्हटलं जातं. एनसीपीचे उमेदवार आसीफ बामला असून ते मुस्लीम मते खेचतील तर त्याचा फटका अर्थात बाबा सिद्धीकींना बसणार आहे. त्यामुळे इथे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.