ऑडिट सिल्लोड मतदारसंघाचं

 सिल्लोड हा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ. मंत्रीपद मिळाल्याने अब्दुल सत्तार आता मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असा दावा करीत आहेत.तर विरोधक त्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत.

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

सिल्लोड: सिल्लोड हा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ. मंत्रीपद मिळाल्याने अब्दुल सत्तार आता मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असा दावा करीत आहेत. तर विरोधक त्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत.

अजिंठा लेणी आणि डोंगरद-यात पसरलेला सिल्लोड मतदारसंघ हा औरंगाबादच्या दृष्टीने एक मोठा मतदारसंघ आहे.

2004 मध्ये भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ अब्दुल सत्तार यांनी 2009 मध्ये खेचून आणला. मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक नसताना सुद्धा सत्तार यांनी लिलया मतदारसंघ खेचून तर आणला सोबतच तालुक्यातील नगरपरिषद आणि पंचायत समित्यांवर सुद्धा त्यांनी काँग्रेसचा झेंडा रोवला.

काँग्रेसचा आक्रमक आमदार, मराठवाड्यातील मुस्लिम चेहरा आणि अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणूनही सत्तार यांची ओळख आहे.

मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघाची लोकसंख्या 367000 इतकी आहे त्यात 265798 इतके मतदार आहेत.

2009च्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांना 97940 मत पडली तर त्यांचे विरोधक भाजपचे सुरेश बनकर यांना 69340 मत पडली होती, जवळपास 27 हजारपेक्षा जास्त मतांनी सत्तार यांनी आपला विजय साजरा केला.

विकासात तालुका प्रचंड मागासलेला असल्याचं सत्तार सुद्धा मान्य करतात मात्र गेल्या 5 वर्षांत विकासकामांचा धडाका लावल्याचं सत्तार सांगताय. त्यामुळे तालुक्यात कायापालट झाल्याचं सुद्दा सत्तार सांगतात. 88 टक्के आश्वासन पूर्ण केली असं सत्तार यांचा दावा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात असूनही लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने हा मतदारसंघ जालना लोकसभेत मोडल्या जातो. त्यात लोकसभेत सत्तार तर विधानसभेत दानवे एकमेकांना मदत करतात अशी चर्चा असते, त्यामुळे भाजपचं फळी कमकुवत असल्याने सत्तार यांना याचा चांगलाच फायदा होतो. पण असं जरी असलं तरी मतदारसंघातल्या समस्या मात्र कायम आहेत

अजिंठा लेणी असल्याने औरंगाबादपासून 4 पदरी रस्ता असणे गरजेचे आहे मात्र अजूनही दोनपदरी रस्त्यावरच सगळी ट्राफीक आहे. अजिंठा सारख्या लेणी असूनही, पर्यटनाच्या दृष्टीनेही काहीच भरीव असे काम झाले नाही हे सत्य नाकारता येत नाही. 

ग्रामीण भागात रस्त्यांच्या जाळे अजिबात नाही त्यामुळे ग्रामिण भागातील जनता त्रासली आहे.

दुष्काळी तालुका असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवणे गरजेचं आहे मात्र प्रश्न कायम आहे. खडकपूर्णा नदीचे पाणी अजूनही सिल्लोडला मिळू शकले नाही.

खेळणा धरणाचे पाणी आणण्याचा प्रय़त्न काही अशी पूर्ण झालाय. मात्र अजूनही मोठ्या प्रयत्नांची गरज ती आहेच..त्यात शहरात बाजारपेठ निर्माण झाली मात्र शहराच रुपडं मात्र बकालच असल्याचं चित्र आहे.

सत्तांराचे तालुक्यातील विरोधक मात्र सत्तार फक्त भूलथापा मारीत असल्याचं सांगताय कुठलही मोठ काम केलं नाही ग्रामिण भागातील अडाणी जनतेला फसवून निवडणूक जिंकण्यातच सत्तारांना रस असल्याचा आरोप विरोधक करताय.

मतदारसंघात सबकुछ सत्तार असे चित्र निर्माण करण्यात सत्तार यशस्वी झाले आहेत. मतदारांच्या प्रतिक्रीयाही संमिश्र अशाच आहेत. कुणी विरोधात तर कुणी समर्थनाथ

सत्तारांचे मतदारसंधावरील वर्चस्व आणि भाजपचा कमकुवतपणाच सत्तारच्या विजयात मोलाचे ठरू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करताय.

येणाऱ्या निवडणूकीत सत्तारांना एमआयएमचे आव्हानही पेलावे लागणार आहे. 

दानवे आणि सत्तार हे दोन्ही मंत्री असल्याने, या दोन मंत्र्यांच्या प्रतिष्ठेत यावेळेसची निवडणूक रंगतदार होईल अशी आशा निर्माण झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.