ऑडिट - पुणे (लोकसभा मतदारसंघाचं)

विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकी मिळणार का...? जनतेची कामे झालीयेत का...? सत्ताधारी आणि विरोधक आगामी निवडणुकीच्या कसे तयारीला लागलेत... ? या सगळ्याचा वेध पुणे लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा... 

Updated: Oct 7, 2014, 09:35 PM IST
 title=

पुणे : विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकी मिळणार का...? जनतेची कामे झालीयेत का...? सत्ताधारी आणि विरोधक आगामी निवडणुकीच्या कसे तयारीला लागलेत... ? या सगळ्याचा वेध पुणे लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा... 

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी... शिक्षणाचं माहेरघर... आयटी हब, साहित्यिक-सामाजिक चळववळींचं केंद्र... अशी विशेषणं लाभलेली ही पुण्यनगरी... पुण्याच्या राजकीय आखाड्याचा विचार करता लोकसभेच्या ४ मतदारसंघात विभागल्या गेलेल्या पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदार संघ आहेत. या संख्येवरूनच पुण्याचं राजकीय महत्व लक्षात येतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झालेले प्रकाश जावडेकर याच पुण्यातले...

शहरी आणि ग्रामीण असा विचार केल्यास पुण्यामध्ये विधानसभेचे ८ तर पिंपरी चिंचवड मध्ये ३ मतदार संघ आहेत. उर्वरित १० मतदार संघ ग्रामीण क्षेत्रात येतात.

विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या ६ विधानसभांपैकी एकाच ठिकाणी बारामतीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत.   

पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. तर पुणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. जिल्ह्यातील लोकसभेचे  ४ पैकी  २ खासदार शिवसेनेचे, एक भाजपचा तर एक राष्ट्रवादीचा आहे. २१ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या बंडखोर धरून आमदारांची संख्या  ९ आहे. काँग्रेसचे ४ आमदार आहेत. भाजपचे  ४ तर शिवसेनेचे ३ आमदार आहेत. चिंचवड च्या आमदारांचा उल्लेख अपक्ष असाच करावा लागेल. गेल्या वेळी मनसे ला एक जागा मिळाली होती. मात्र आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत खडकवासला मतदार संघ भाजपकडे गेला. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.