सिंधुदुर्ग : दुर्ग किल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा... लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते मच्छी-सोलकढीपर्यंत अनेक वैशिष्ठ्याने सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा.
पूर्वीही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता..मात्र नारायण राणे यांनी सेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले... त्यानंतर हा काँग्रेसचा गड बनला.
सिंधुदुर्गात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी असे तीन मतदार संघ या जिल्ह्यात आहेत.
यापैकी कुडाळ मतदारसंघात कुडाळ आणि मालवण तालुक्यांचा समावेश होतो. तर कणकवली मतदारसंघात कणकवली,देवगड आणि वैभववाडी तालुक्याचा समावेश आहे
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांचा समावेश होतो.
या जिल्हातील राजकीय बलाबलाचा विचार करता काँग्रेसकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांकडं प्रत्येकी एक-एक विधानसभा मतदारसंघ आहे.
कुडाळ मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात असून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघावर घट्ट पक्कड बसवली आहे.
सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिपक केसरकर हे आमदार आहेत. पण नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेनेच्या शिवबंधनात अडकण्याचा निर्णय घेतल्यानं यामतदारसंघाचं राजकीय गणित पुन्हा बदलणार आहेत.
देवगड मतदारसंघात भाजपचे प्रमोद जठार आमदार आहेत. हा मतदारसंघ भाजपचा आणि गोगटेंचा हा बालेकिल्ला मानला जातो..मात्र जठार यांच्या या मतदारसंघात अलिकडच्या काळात नितेश राणेंची कनेक्टिव्हीटी वाढली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.