ठाणे जिल्ह्यातले १२५ तरुण बेपत्ता? गुप्तचर यंत्रणांचं अपयश

इराकमध्ये दहशतवादी संघंटनेबरोबर मिळून घातपात घडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळपास १३५ मुलं गेली असल्याची माहिती समोर आलीये. या माहितीमुळं तपास यंत्रणांची झोप उडाली असून, देश भरातील मोठं मोठ्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा छड़ा लावण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. 

Updated: Jul 16, 2014, 07:58 PM IST
ठाणे जिल्ह्यातले १२५ तरुण बेपत्ता? गुप्तचर यंत्रणांचं अपयश title=

ठाणे: इराकमध्ये दहशतवादी संघंटनेबरोबर मिळून घातपात घडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळपास १३५ मुलं गेली असल्याची माहिती समोर आलीये. या माहितीमुळं तपास यंत्रणांची झोप उडाली असून, देश भरातील मोठं मोठ्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा छड़ा लावण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. 

दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण दहशतवादी संघंटनेबरोबर गेले पण त्याची चुणूक देखील नसल्यानं राज्यातील गुप्तचर यंत्रणेचं हे अपयश असल्याचं बोललं जातंय.  

आरीफ मजीद, फारुख तानका, फहाद शेख आणि अमन तांडेल... कल्याणमधले हे चार तरुण इराकमध्ये असल्याच्या संशयानं एकच खळबळ उडाली. त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर आलीय... त्यामुळे तपास यंणत्रांची झोपच उडालीय... ठाणे आणि कल्याणमधून फक्त चार नव्हे, तर तब्बल सव्वाशे तरुण गायब झालेत. पण यातली अडचणीची बाब अशी की बेपत्ता झालेल्या फक्त चारच मुलांच्या पालकांनी तशी तक्रार केलीय. 

कल्याण आणि आसपासचे ३० तरुण एकत्र इराकला रवाना झाले होते. डोंगरी भागातल्या अजमेरी ट्रॅव्हल्सकडून हे तरुण इराकला धर्मस्थळाला भेट देण्यासाठी गेले होते. ७ जूनला हे सगळे तरुण भारतात परतणं अपेक्षित होतं. पण ६ जूनलाच हे सगळे तरुण रहस्यमयरित्या गायब झालेत. या गायब झालेल्यांचा शोध घेता घेता चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. मुंब्रा, कल्याण, भिवंडी, ठाणे आणि शिळफाटा या भागातून तब्बल १२५ तरुण गायब झालेत. २३ ते २६ मे या तारखांदरम्यानच हे सगळे बेपत्ता झालेत. 

ही सगळी मुलं २० ते २५ वयोगटातली आहेत. हे सगळे कल्याणमधल्या एका धर्मगुरुच्या संपर्कात होते. या धर्मगुरुनंच तरुणांना इराकला पाठवल्याचा संशय आहे आणि आता ते इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या धक्कादायक घटनेमुळं गुप्तचर यंत्रणांचं अपयश समोर आलंय. एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते, हे कोणत्याही यंत्रणेला माहित कसं नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी तरुण बेपत्ता होतात, तरीही स्थानिक पोलीस यंत्रणांना कानोकानी खबर कशी लागत नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.