जळगाव : १६ वर्षांच्या मुलीने जन्मादात्रीचाच खून केला. तिच्या आईने प्रेमाला विरोध केल्याने तिची हत्या मुलीने केली.
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड इथली घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या आईच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून मुलीने तिला संपविले. ही घटना ३ ऑगस्टला घडली होती. मात्र, तिच्या मामाने पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिस तपासात मुलीने खून केल्याचे उघड झाले. मुलीच्या मामाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगी भडगाव पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.