नागपूर: राज्यात 2 ते 3 हजार कोटींचा धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनीच केलाय.
या घोटाळ्यात वाहतूकदार आणि कंत्राटदारांचा समावेश आहे. मात्र पोलीस अपेक्षित कारवाई करत नाहीत, असं बापट यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितलं. रेशनवरील धान्य घोटाळा रोखण्यासाठी राज्यात दक्षता पथक तयार करणार. हे पथक दुकान आणि गोदामांची तपासणी करेल.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना या पथकात नोकऱ्या देण्यात येतील, असंही बापट यांनी यावेळी सांगितलं. मॅगी वादानंतर आणखी 30 पदार्थांची तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.