नागपूर: नागपूरच्या खुल्या कारागृहातून पुन्हा 1 कैदी फरार झालाय. पुरूषोत्तम भोईर असं या कैद्याचं नाव आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. आज दुपारी ही घटना घडली.
पुरुषोत्तम भोईर एका हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी शारीरिक श्रमासाठी पुरुषोत्तमला जेलच्या बाहेर शेतावर आणण्यात आलं असताना तो फरार झाला.
याच कारागृहातून अडीच महिन्यापूर्वी 5 कैदी फरार झाले होते. पैकी अजूनही 2 कैद्यांना अटक झालेली नाही. त्यामुळं नागपूर कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.