...म्हणून वसतिगृहातल्या मुलींना रात्रभर उपाशी ठेवलं!

मुलींनी केवळ पाण्याची मोटार बिघडवल्यानं संस्थाचालकांनी चक्क वसतीगृहातल्या मुलींना रात्रीपासून उपाशी ठेवल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीय. 

Updated: Feb 2, 2016, 07:55 PM IST
...म्हणून वसतिगृहातल्या मुलींना रात्रभर उपाशी ठेवलं!  title=

अहमदनगर : मुलींनी केवळ पाण्याची मोटार बिघडवल्यानं संस्थाचालकांनी चक्क वसतीगृहातल्या मुलींना रात्रीपासून उपाशी ठेवल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीय. 

विशेष म्हणजे, या वसतीगृहाला शासकीय अनुदान मिळत असतानाही संस्थाचालकांनी मुलींना मारहाण करत त्यांच्याकडून मोटारची नुकसान भरपाई वसूल केली. दरम्यान, पोलिसांनी या संस्थाचालकाला ताब्यात घेतलंय.

अहमदनगर शहरातल्या जानकीबाई आपटे मुलींच्या वसतिगृहातली ही घटना आहे. या वसतिगृहातली पाण्याची मोटार चालू राहिल्यानं जळून गेली. याचा राग येऊन, वसतीगृह संस्थाचालक जयंत करंदीकर यांनी एकवीस मुलींना रात्रभर उपाशी ठेवलं. तसंच दुसऱ्या दिवशी परीक्षा असतानाही शाळेत बसू न देता वसतिगृहातच डांबून ठेवलं. तर मारहाण करून मोटारीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक मुलीकडून १ हजार २०० रुपयेही वसूल केले. 

दरम्यान, आपण कोणतंही गैरकृत्य केलं नसल्याचा दावा, संस्थाचालक जयंत करंदीकर यांनी केलाय. त्याच वेळी वसतीगृहाबाबत चुकीची बातमी छापून आली तर वसतीगृहच बंद करण्याची धमकीही या महाशयांनी दिली.