मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळं झालेल्या अपघातामुळं वाहतूक ठप्प झालीय. मुंबईकडं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालीय. 

Updated: Sep 5, 2016, 08:36 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प title=

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळं झालेल्या अपघातामुळं वाहतूक ठप्प झालीय. मुंबईकडं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालीय. 

पर्यायी वाहतूक खंडाळामार्गे वळवण्यात आलीय. अमृतांजन पुलाजवळ एकमेकांना धडकलेले हे तीन ट्रक हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यामुळं मुंबईकडं येणारी वाहतूक ठप्प झालीय. 

वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याला अजून काही तास लागतील, असा अंदाज आहे.