सांगली : पुणे-बंगळुरू महामार्गावर नाकोडा ट्रॅव्हल्स उलटल्याने झालेल्या अपघाता तीन प्रवासी ठार तर सात जण जखमी झालेत.
नेर्ले जवळच्या भिवर्गी मळ्याजवळ पहाटे पावणे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबईहून इचलकरंजी कडे ही बस निघाली होती.
चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस डीवायडर वर आदळून हा अपघात झाला. जखमींवर राजारामबापू रुग्णलयात उपचार सुरू आहेत. नवीन मुजावर , सागर साळुंखे आणि कृष्णात पाटील अशी मृतांची नावे आहेत.