नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

'नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणी केला असेल, हे मला तेव्हाच कळालं होतं... परंतु ते सत्य मी नाकारत राहिलो' असा धक्कादायक खुलासा अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलाय. 

Updated: Nov 21, 2015, 08:42 PM IST
नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी title=

पुणे : 'नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणी केला असेल, हे मला तेव्हाच कळालं होतं... परंतु ते सत्य मी नाकारत राहिलो' असा धक्कादायक खुलासा अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलाय. 
  
'एका मागून एक पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनामुळे मात्र आता या विषयाची भयानकता जाणवत आहे' असंही अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात म्हणलंय. 'डॉ नरेंद्र दाभोलकर - पृथ्वीमोलाचा माणूस' या पुस्तकाचं नुकतच पुण्यात अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन झालं तेव्हा ते बोलत होते. 

पुरोगामी प्रतिकं संपविण्याचं काम प्रतिगामी विचारांतून केलं जातं असून हे थांबविण्यासाठी नवीन नेता, नवीन प्रतिकही निर्माण करणं गरजेचं झालं असल्याचही त्यानं यावेळी म्हटलंय. यावेळी 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शैला दाभोलकर हेदेखील उपस्थित होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.