नाशिक : मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्याकडून ३५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी, रामचंद्र पवार यांना अटक करण्यात आली आहे.
एका जमीन प्रकरणात शेतकऱ्याकडून ही लाच मागण्यात आली. रामचंद्र पवारांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना नाशिकला नेण्यात येत आहे. रामचंद्र पवारच्या घरी देखील एसीबीने छापा टाकला आहे.
नाशिक विभागात काही दिवसांपूर्वी एका तहसिलदाराला लाच घेतांना अटक करण्यात आली होती, जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या तहसिलदार आशा गांगुर्डे यांना ३० हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. तहसिलदार यांच्यानंतर नाशिक विभागात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक झाली आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा चर्चेचा विषय आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.