मुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी

मुंबईप्रमाणेच ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. 

Updated: Sep 10, 2014, 10:00 AM IST
मुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी title=

मुंबई : मुंबईप्रमाणेच ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. 

मुंबई व ठाणे ही दोन्ही शहरे एकमेकांना लागून असून सर्वसाधारण भौगोलिक परिस्थितीमध्ये तसेच जमिनीच्या आणि सदनिकांच्या किंमतीमध्ये फार जास्त फरक नाही. त्यामुळं शासनाने विकास नियंत्रण नियमावलीस अंतिम मंजुरी देतांना, ठाणे शहरासाठी देखील मुंबईप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यास मंजुरी दिलीय. 

झोपडपट्टी पुनर्विकास योजना मंजूर करण्यासाठी मुंबई शहरासाठी स्वतंत्र प्राधिकरण आहे. अशा प्रकारचे प्राधिकरण सध्या ठाणे शहरासाठी अस्तित्वात नाही. त्यामुळं सध्या तरी ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनांच्या प्रस्तावाना मंजुरी देण्याकरिता मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणालाच प्राधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.