मोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्यांना अजितदादांना काय झालं...

भाजप सरकारला पाठींबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषा अचानक एकदम बदललीय.

Updated: Nov 15, 2014, 09:39 PM IST
मोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्यांना अजितदादांना काय झालं... title=

पिंपरी : भाजप सरकारला पाठींबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषा अचानक एकदम बदललीय.

सत्तेत असताना भाजपवर आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सो़डणारे अजित पवार आता एकदम नरम भूमिका घेताहेत.

पुणे मेट्रोसाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचा साक्षात्कार पवारांना झालाय. तसंच पुण्याचे प्रश्न ज्या मंत्र्यांशी संबंधित आहेत त्या सर्वांशी आपले चांगले संबंध असल्याचं ते म्हणत आहेत.

एलबीटीच्या मुद्द्यावर पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. एवढंच नाही तर चांगल्या कामाला प्रतिसाद मिळाला तर जवळीक कशी असा सवालही अजित पवारांनी पुण्यात विचारला. पुणे महानगरपालिकेत अजित पवारांनी आज पुण्याशी संबंधित मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक घेतली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.