पुणे : सध्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात प्रचार दौरे करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. अजित पवारांची गाडी चक्क बारामतीत अडवली गेली. त्यामुळे ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चा सुरु झाली.
जिल्हा परिषदेच्या प्रचारानिमित्त अजित पवारांच्या तालुक्यात अनेक सभा आहेत. त्यासाठी ते तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी एका सभेच्या ठिकाणी अजितदादा जात होते. रस्त्यामध्ये पोलीस गाड्या थांबवून त्यांची तपासणी करत होते. याच दरम्यान एक कार आली. त्यावेळी पोलिसांनी हात केला आणि गाडी थांबवली.
कारची काच खाली केली तर आतमध्ये चक्क अजित पवार. अजित पवारांनी पाहिले तर तो पोलीस होता निवडणूक भरारी पथकासोबत. यावेळी पवारांनी भरारी पथकाला न अडवता गाडीची तपासणी करु दिली. त्यांनी त्यांची चौकशी केली. अजित पवारांनी सर्वकाही माहिती दिली आणि लगेच ते पुढच्या सभेसाठी रवाना झाले.