अकोल्यात महिनाभर चालतो होळी सण

होळी सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो.  

Updated: Mar 5, 2015, 11:51 PM IST
अकोल्यात महिनाभर चालतो होळी सण title=

अकोला : होळी सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो.  

दांडीपौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरी करतो.  बंजारा समाजात लोकगीतांना मोठं महत्त्व असतं. त्याला लेंगीगीत म्हणतात. बंजारा समाजाचा संघर्ष, शिक्षणाचा महत्त्व, व्यसनमुक्ती किंवा मग वात्रटीका अशा स्वरुपात ही गाणी असतात. बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. 

या दिवशी फगवा मागणं हा महिलांचा जणू हक्कच. आणि तो मिळवण्यासाठी महिला पुरूषांना काडीने मारतातही.. हा संपूर्ण कार्यक्रम तांडा प्रमूख नाईकाच्या घरासमोर साजरा होतो.

दुसऱ्या दिवशी पितरांचं पुजन केलं जातं. त्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या शेवया बनवतात. बंजारा संस्कृती आणि परंपरेनुसार होळी पहाटे पेटवतात. लहान आणि मोठी अशा दोन होळ्या पेटवतात. उपवर मुलं होळीसाठी लाकडं जमवतात...या उपवर मुलांना 'गेरीया' असं म्हटलं जातं.. त्यानंतर गेरीया होळी भोवती प्रदक्षिणा घालून विहिरीवर होळीचा प्रसाद खातात. बंजारा समाजातली महिनाभर साजरी केली जाणारी ही होळी म्हणजे दिवाळीच म्हणावी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.