दारुबंदीवरुन शिवसेनेची न्यायमूर्तींवरच टीका

येथील कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायमूर्तींवरच टीकास्त्र सोडलं. लोकांनी दारु प्यायची की नाही याचा निर्णय सरकरनं घ्यायला पाहिजे, मात्र न्यायमूर्ती तो निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2017, 02:24 PM IST
दारुबंदीवरुन शिवसेनेची न्यायमूर्तींवरच टीका  title=

नाशिक : येथील कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायमूर्तींवरच टीकास्त्र सोडलं. लोकांनी दारु प्यायची की नाही याचा निर्णय सरकरनं घ्यायला पाहिजे, मात्र न्यायमूर्ती तो निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत.

काही लोकांना आनंद मिळतो तो आनंद अशाप्रकारे हिरावून घेतला जातोय. न्यायमूर्तींनी आधी सरकारकडून मिळालेल्या सुविधा, तसंच क्लब हाउसचा त्याग केला पाहिजे, असं आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केलं. 

न्यायामूर्तीच आता राजकारण करु लागलेत. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे आणि निवडणुका लढवाव्यात. त्यांना किती मतं पडतात हे बघू असे जाहीर आव्हानही राउत यांनी न्यायाधीशांना देऊन टाकलं.