अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

अंबरनाथ शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ उर्फ पप्पू यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय.

Updated: Dec 25, 2015, 04:09 PM IST
 अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला title=

अंबरनाथ : अंबरनाथ शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ उर्फ पप्पू यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. सकाळी १०च्या सुमारास पप्पू यांच्यावर हा हल्ला झालाय. 

हल्ल्यानंतर तातडीने रमेश यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.

दरम्यान, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबतचा तपास सुरु आहे.