भाकरीसाठी शेतकऱ्याचं अपहरण, पिक वाया जावू नये म्हणून बनाव

शेतातील सोयाबिन वाचवण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्रीच्या एका शेतकऱ्यानं भन्नाट आयडियाची कल्पना केली. रात्री जेवून सहकारी झोपतात म्हणून या सुदाम सुरडकर नावाच्या या शेतकऱ्यानं त्याच्या अपहरणाचा बनाव केला, भाकरीसाठी काही दरोडेखोरांनी माझं अपहरण केल्याचा फोनही त्यानं आपल्या सहकाऱ्यांना केला, त्यामुळं परिसरात चांगलीच दहशत पसरली. 

Updated: Aug 31, 2015, 03:53 PM IST
भाकरीसाठी शेतकऱ्याचं अपहरण, पिक वाया जावू नये म्हणून बनाव title=

सिल्लोड, औरंगाबाद: शेतातील सोयाबिन वाचवण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्रीच्या एका शेतकऱ्यानं भन्नाट आयडियाची कल्पना केली. रात्री जेवून सहकारी झोपतात म्हणून या सुदाम सुरडकर नावाच्या या शेतकऱ्यानं त्याच्या अपहरणाचा बनाव केला, भाकरीसाठी काही दरोडेखोरांनी माझं अपहरण केल्याचा फोनही त्यानं आपल्या सहकाऱ्यांना केला, त्यामुळं परिसरात चांगलीच दहशत पसरली. 

आणखी वाचा - रिमझिम पावसाचा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा

जोपर्यंत भाकरी आणून देणार नाही तोपर्यंत माझी सुटका होणार नाही, असंही सुदामनं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं आणि नंतर चोरट्यांना चुकवून मी पळून आल्याचंही सुदामनं सांगितलं. 

आणखी वाचा - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'डिसॅलिनेशन' प्रकल्प पुन्हा चर्चेत

मात्र आपलं पिकं वाचवण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न पाहून पोलिसांनाही काय करावं हे कळेनासं झालं. दुष्काळामुळं अनेकांची पिकं वाया गेली आहे, त्यात गाईच्या उपद्रवामुळं हातच पिक वाया जावू नये म्हणून या शेतकऱ्यानं ही शक्कल लढवली. आता याला गुन्हा म्हणावे की अजून काय असाच प्रश्न पोलिसांनाही पडलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.