'गो सेवे'चा सक्सेस फंडा!

एखादा फंडा वापरून एखादा उमेदवार विजयी झाला की तो सक्सेस फंडा म्हणून सगळेच त्यामागे लागतात.. अशाच एका फंड्याची नक्कल सध्या महापालिका निवडणूकीत पहायला मिळतेय.. हा फंडा म्हणजे गो सेवेचा.. खासदार खैरै यांनी सुरु केलेल्या या फंड्याची नक्कल आता शिवसेनेच्या उमेदवारांनीही सुरु केली आहे.

Updated: Apr 15, 2015, 10:44 PM IST
'गो सेवे'चा सक्सेस फंडा! title=

औरंगाबाद : एखादा फंडा वापरून एखादा उमेदवार विजयी झाला की तो सक्सेस फंडा म्हणून सगळेच त्यामागे लागतात.. अशाच एका फंड्याची नक्कल सध्या महापालिका निवडणूकीत पहायला मिळतेय.. हा फंडा म्हणजे गो सेवेचा.. खासदार खैरै यांनी सुरु केलेल्या या फंड्याची नक्कल आता शिवसेनेच्या उमेदवारांनीही सुरु केली आहे.

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरै यांची 'गो सेवा' हा सध्याचा चर्चेचा विषय ठरतोय. अगदी रोजची सकाळ गाईला चारा घालूनच सुरु होते आणि त्यानंतर दिवसाची कामं... लोकसभा निवडणुकांवेळी चंद्रकांत खैरै यांनी ही गाय आपल्या प्रचार कार्यालयात बांधली आणि तिला रोड हिरवा चारा पाणी मिळेल, याची काळजीही घेतली. अशा पुण्यकर्मानंच विजय मिळत असतो असे खैरै खाजगीत सांगतात. 

त्यांच्या याच पुण्यकर्माची री ओढत आता महापालिका निवडणुकांतील उमेदवारांनीही गायींची सेवा सुरु केली आहे. शिवसेनेच्या एका उमेदवारांनं सुद्धा आपल्या प्रचार कार्यालयाच्या बाहेर गो सेवा सुरु केली आहे. हे पुण्यकर्म आपल्याला नक्कीच विजय मिळवून देतील असा विश्वास आत्माराम पवार व्यक्त करताय.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा सेवा करण्यापेक्षा नेहमीच अशी सेवा केली, तर फळ जास्त मिळेल, असं ज्योतिषतज्ञ बालाजी कुळकर्णी सांगताना दिसतात. 

निवडणुका जिंकण्यासाठी हा गो सेवेचा फंडा आता अनेक उमेदवार वापरणार यात शंका नाही, मात्र, खरंच अशा गोष्टी करण्यातून फायदा होतो का? यापेक्षा विकासावर चर्चा केली तर उपयोगाची नाही का? काय योग्य आणि अयोग्य हे मतदानानंतर स्पष्ट होईलच. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.