गोंदिया : जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पुष्पा लिल्हारे या महिलेचीच मुलगी असल्याचं निष्पन्न झाले आहे.
काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या पुष्पा लिल्हारे महिलेनं एका मुलीला जन्म दिला होता. मात्र रुग्णालयातील परिचारिका वनिता मेहर हिने प्रसूती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांना मुलगा झाल्याची बतावणी केली. आनंदात या लिल्हारे कुटुंबीयांनी परिचारिकेला पैसेही दिले. मात्र बाळाच्या जन्म नोदींच्या फाईलीत मुलगी झाल्याचं नमूद करण्यात आले होते.
यामुळे अखेर हे प्रकरण पोलिसांत गेलं. पोलिसांनी नवजात मुलीची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीच्य अहवालावरुन ही मुलगी पुष्पा लिल्हारे या महिलेची असल्याचं निष्पन्न झाले आहे.