अप्रशिक्षित अधिकाऱ्यांमुळे बिबट्याचा मृत्यू, ही हत्याच!

नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी भटकणाऱ्या तहानेलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील कोंबडवाडी गावात हा प्रकार घडला आहे.

Updated: Mar 12, 2015, 03:11 PM IST
अप्रशिक्षित अधिकाऱ्यांमुळे बिबट्याचा मृत्यू, ही हत्याच! title=

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी भटकणाऱ्या तहानेलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील कोंबडवाडी गावात हा प्रकार घडला आहे.

वन विभागाच्या अप्रशिक्षित अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं बेशुध्द केल्यानं विहिरीच्या पाण्यात पडून बिबट्यानं आपला जीव गामावला आहे. 

सह्याद्री पर्वतरांगेपासून जवळच असलेल्या या विहिरीतील बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतेय. नाशिकमध्ये या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनविभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळं या बिबट्याचा अंत झाल्यानं ही एकप्रकारे हत्याच असल्याचा संताप व्यक्त केला जातोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.