बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली.

Updated: Jul 21, 2016, 03:18 PM IST
बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या title=

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली.

त्यांनी लिहलेल्या चिठीत बँक घोटाळ्यात दोन माजी अध्यक्ष जबाबदार आहेत. इतरांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटले आहे. मेघराज हे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे चिरंजीव तर भाजप नेते रमेश आडसकर यांचे बंधू आहेत. 

मृत्यूपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. मेघराज यांचा अंबाजोगाई येथील हौसिंग सोसायटी भागात बंगला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब लातूरला राहत असल्याने ते अधून मधून येथे एकटेच राहण्यासाठी येत असत. बुधवारी ते मुक्कामासाठी अंबाजोगाईत आले होते. मध्यरात्री त्यांनी स्वत:च्या बेडरूममध्येच पेटवून घेऊन आत्महत्या केली. 

घरात कोणीच नसल्याने हा प्रकार गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. सकाळपासूनच त्यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी बंगल्यावर येत होते. परंतु दरवाजा बंद असल्याने अजून ते उठले नसतील म्हणून कोणीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला नाही. परंतु दुपार होत आली तरी दरवाजा बंद असल्याने कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर बेडरूममध्ये त्यांचा जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह दिसला.