भैय्यूजी महाराजांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला

 राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचा काल उस्मानाबाद इथे कळंबजवळ अपघात झाला होता. त्यांच्या मेंदूला आणि छातीला मार लागला होता. त्यांना उपचारासाटी गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांचं चेकअप करून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. त्यांना दोन दिवसांचा आराम डॉक्टरांनी सांगितलाय. 

Updated: Dec 13, 2014, 10:55 PM IST
भैय्यूजी महाराजांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला title=

परळी : राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचा काल उस्मानाबाद इथे कळंबजवळ अपघात झाला होता. त्यांच्या मेंदूला आणि छातीला मार लागला होता. त्यांना उपचारासाटी गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांचं चेकअप करून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. त्यांना दोन दिवसांचा आराम डॉक्टरांनी सांगितलाय. 

भय्यू महाराज यांच्या कारचे टायर फुटल्याने त्यांच्यासह इतर दोघेजण  किरकोळ जखमी झाले  होते. परळी येथे गोपीनाथ गड स्मारकाचे भूमिपूजन आटोपून परतत असताना कळंबनजीक त्यांच्या कारसमोर एक गाय आली. तिला वाचविताना गाडीचे टायर फुटले.

अंबाजोगाई- युसुफवडगाव रोडवरील कळंबनजीक शुक्रवारी रात्री अपघात झाला होता. या अपघातात भय्यू महाराज यांच्या पायाला एक जखम झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.