नाशिक : ज्यांना काही लिहायचं नाही, त्यांचं नुसतं टीव्ही बघण्यापेक्षा घुमानला जाऊन पंजाब फिरणं झालं अशी खोचक टीका, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य संमेलनावर नाशिकमध्ये केली.
तर टीकाकारांची तोंडं घुमान साहित्य संमेलनानं बंद केल्याचं प्रत्त्युत्तर, संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी नेमाडेंच्या आरोपांवर बोलताना दिलं.
दिवाकर रावतेंची प्रतिक्रिया
घुमान साहित्य संमेलनात सीमावासीयांचा विसर पडणं हे दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया, शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलीय. संमेलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अनुल्लेखामुळेही मराठी मनं दुखावील गेल्याची प्रतिक्रिया रावते यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.