'भास्कर जाधव यांच्यामुळे राष्ट्रवादीचं वाटोळं'

राष्ट्रवादीचे कोकणातले नाराज नेते भास्कर जाधव यांच्यावर माजी आमदार रमेश कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Updated: Oct 27, 2016, 04:11 PM IST
'भास्कर जाधव यांच्यामुळे राष्ट्रवादीचं वाटोळं' title=

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे कोकणातले नाराज नेते भास्कर जाधव यांच्यावर माजी आमदार रमेश कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. भास्कर जाधव खोटं बोलत आहेत, तो त्यांचा स्वभावच आहे. भास्कर जाधवांनीच पक्षाचं वाटोळं केलं, पक्षात फूट पाडली, अशी टीका रमेश कदम यांनी केली आहे. 

भास्कर जाधव यांनी संघटना खिळखिळी करण्याचं काम केलं. त्यांच्यामुळेच उदय सामंत शिवसेनेत गेले, असा आरोपही कदम यांनी केला आहे. कदम हे सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. रमेश कदम यांच्या या टीकेमुळं तटकरे विरूद्ध भास्कर जाधव वाद शिगेला पोहोचला आहे.