छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

Updated: Jan 27, 2016, 01:43 PM IST
छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी title=

सातारा : 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीमध्ये धारातीर्थ मोहीम राबवण्यात आली आहे. ह्या मोहीमेच्या सांगता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याच वेळी संभाजी भिडेंनी ही मागणी केलीय.

भिडे गुरुजींच्या या मागणीवर तूर्तास मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, शिवाजी महाराजांचा गौरव करताना संभाजी भिडेंच्या कामाची प्रशंसा त्यांनी केलीय. 

पाहा काय म्हणाले भिडे गुरूजी