भाजपला मोठा धक्का, घाडीगावकर यांचा उमेदवारी अर्ज बाद

पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीनंतर भाजपच्या मोठ्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 4, 2017, 07:09 PM IST
भाजपला मोठा धक्का, घाडीगावकर यांचा उमेदवारी अर्ज बाद title=

ठाणे : पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीनंतर भाजपच्या मोठ्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

भाजपच्या संजय घाडीगावकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. गेल्या टर्ममध्ये संजय घाडीगावकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते, त्यामुळे त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यात बंदी होती.

या मुदद्याचा आधार घेत शिवसेनेच्या प्रकाश शिंदे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन संजय घाडीगावकर यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.