भाजपच्या माजी महापौर कल्पना पांडे यांची लाचखोरी उघड

सुमीत ठाकूर प्रकरणात भाजपची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली असतानाच आता पक्षाच्या एका माजी महापौराला एसीबीने लाच मागितल्या प्रकरणी अटक केलीय. 

Updated: Oct 14, 2015, 11:37 PM IST
भाजपच्या माजी महापौर कल्पना पांडे यांची लाचखोरी उघड

नागपूर : सुमीत ठाकूर प्रकरणात भाजपची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली असतानाच आता पक्षाच्या एका माजी महापौराला एसीबीने लाच मागितल्या प्रकरणी अटक केलीय. 

नागपूरच्या माजी महापौर आणि भाजप नेत्या कल्पना पांडे आणि त्यांची बहीण भारती पांडे यांना अटक करण्यात आलीय. छनुलाल विद्याभवनमधील एका निवृत्त शिक्षिकेच्या निवृत्ती वेतनासंबंधी कागदपक्षांवर सही करण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. 

कल्पना पांडे छन्नूलाल विद्याभवन हायस्कूल या संस्थेच्या सदस्य आहेत. तर भारती पांडे त्याच शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. या संबंधी एसीबीला तक्रार मिळाल्यावर संबंधित अधिका-यांनी अटकेची कारवाई केली. 

दरम्यान, ही अटक म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप भाजर शहर अध्यक्षांनी केलाय. तसंच शिक्षण संस्थेतून अटक करताना पोलिसांनी मर्यादा ओलांडल्याचाही आरोप केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.