भाजप आमदाराकडून संरक्षणासाठी महिलांना दंडुक्यांचं वाटप

धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी महिलांना कायदा हातात घेण्याचं अजब आवाहन केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 20, 2017, 07:18 PM IST
 भाजप आमदाराकडून संरक्षणासाठी महिलांना दंडुक्यांचं वाटप title=

धुळे : धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी महिलांना कायदा हातात घेण्याचं अजब आवाहन केलं आहे. आमदार गोटे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या गृह खात्यालाच खुलं आव्हान देत शहरातील महिलांना आत्मसंरक्षणासाठी दांड्यांचं वाटप केलं आहे. 

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करीत आमदार गोटे यांनी दंडुक्यांचे वाटप केले आहे.  महिलांनी कायदा हातात घ्यावा असे सांगत बाकी परिमाणांची काळजी करू नये असे आमदार गोटे यांनी सांगत याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.