लातूर : भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवण्याचा सल्ला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
मीडियायातून एकमेकांवर टीका करण्यापेक्षा बैठकीत चर्चा करून वाद मिटवण्याचा सल्लाही खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. जर भाजप-शिवसेनेतला वाद मिटला नाही तर आगामी विधानसभेत लोकसभेतल्या यशाची पुनरावृत्ती करणं कठीण जाणार असल्याचा इशारा त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना दिलाय.
भाजप नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेसोबतची युती तोडून एकला चलोरेची भूमिका घेतली होती. त्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी युती अभेद्द असल्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर हा वाद काही निवळलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.