निजामानंच वाढलेली बिर्याणी खाता!

शिवसेना आणि भाजपमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Updated: Jun 23, 2016, 06:39 PM IST
निजामानंच वाढलेली बिर्याणी खाता! title=

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. शिवसेनेनं निजामावरून केलेल्या टीकेवरून हल्ले आणि प्रतीहल्ले सुरुच आहेत. निजामानं वाढलेली बिर्याणी एका हातानं खाता आणि दुसऱ्या हातानं आमच्यावर टीका करता, असं भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले आहेत. 

भाजपचे पाक्षिक असलेल्या मनोगतमध्ये ही टीका करण्यात आली आहे. तसंच काडीमोड कधी घेत आहात, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला आहे. निजामानं दाखवलेल्या दातृत्वामुळेच शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळाली, सोयीसुविधा उपभोगूनही भाजपला शाप देणं म्हणजे उपकारांची जाणीव नसणं, असंही भांडारी म्हणाले आहेत. 

राज्यात शिवसेनेची ताकद कमी होतं आहे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हे वास्तव पचवता येत नाही, त्यामुळे त्यांना नैराश्य आल्याचं भांडारी या लेखामध्ये म्हणाले आहेत.  

औरंगाबादमध्ये झालेल्या शिवसेनेच्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाजपची तुलना निजामाच्या राजवटीशी केली होती. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती.