सोलापूर महापौरपदी भाजपच्या बनशेट्टी

महानगरपालिकेच्या ३७व्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची तर उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल यांची निवड झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2017, 08:36 PM IST
सोलापूर महापौरपदी भाजपच्या बनशेट्टी title=

सोलापूर : महानगरपालिकेच्या ३७व्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची तर उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल यांची निवड झाली.

महापौर बनशेट्टी यांनी सेनेच्या कुमुद अंकाराम यांचा २८ मतांनी पराभव केलाय तर उपमहापौर भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी सेनेचे अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव केलाय. एमआयएमच्या ९ नगरसेवकांनी आणि बीएसपीच्या ४ नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडीतून मतदान न करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे भाजपला विनासायास सत्ता काबीज करता आलीय.  सोलापूरच्या विकासाला प्राधान्य देत विकासावर भर देण्याचे आश्वासन नूतन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिलाय.