ठाणे : जुन्या चलनातील नोटा बँकेत भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात बँकेत भरणा करावा तसेच काळापैसा ही भरणा करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयटी विभागाचे मुख्य आयुक्त ए सी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोबतच ३० डिसेंबरनंतर जर जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा आढळल्यास नव्या कायद्यानुसार कारागृहाची हवाही खावी लागणार असल्याची माहिती दिली असं देखील शुक्ला यांनी दिली आहे
चलनातून बाद ठरविण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बँकेत भरण्याची शेवटची दोन दिवसाची मुदत आहे. या मुदतीत नागरिकांनी पैशाचा भरणा करावा आणि केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना २०१६ च्या नव्या योजनेचा लाभ घ्यावा. त्यानंतर मात्र जुन्या नोटा आढळल्यास नव्या बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा २०१६ अनुसार जेलची हवा खावी लागणार आहे.
काळा पैसे बाहेर काढण्यासाठी सरकारने योजना राबविल्या. दरम्यान शेवटच्या दोन दिवसामध्ये नागरिकांना सूट देत नव्या योजनेअंतर्गत जवळ असलेली बेहिशेबी पैसा बँकेत भर करण्याची मुभा दिली. दोन दिवसात भरण्यात आलेली रक्कमेपैकी ४९ टक्के रक्कम ही आयकर आणि दंड स्वरूपात घेऊन रक्कमेच्या २५ टक्के रक्कम ही ४ वर्षाकरिता अनामत रक्कम विना व्याज बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये ठेवण्यात येईल आणि उर्वरित २५ टक्के रक्कम हातात मिळणार आहे.
दुसरीकडे ज्या बँक खातेदारांनी नोटबंदीनंतर आपल्या खात्यावर भरमसाठ रक्कम भरली आहे आणि त्या रक्कमेचे विवरण देण्यास खातेदार अयशस्वी ठरत आहे. अशा खातेदारांनी ३१ मार्चपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन बेहिशेबी रक्कमेबाबत दिलेल्या निर्देशानुसार प्रक्रिया पूर्ण करावी. योजनेची माहिती ऑनलाईन आणि बँकेत फॉर्म भरून करावी आणि होणाऱ्या कारवाईतून आपली सुटका करून घेण्यात यावी असे आवाहन ठाणे जिल्हा आयकर प्रधान आयुक्त श्री कृष्णा यांनी केले आहे.