ठाणे : नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नजीब मुल्ला यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहेत.
मुल्लांच्या खात्यातून आव्हाडांच्या खात्यात १ कोटी
सूरज परमार आत्महत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी सोमवारी सरकारी पक्षानं धक्कादायक खुलासा केला.ठाणे महापालिकेचा राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या खात्यातून १ कोटी रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात वळते झालेत. त्याशिवाय इतर ३ नगरसेवकांच्या खात्यातूनही अनेक नेत्यांना पैसा वळते झाल्याचे पुरावे सोमवारी वकिलांनी मुंबई हायकोर्टात सादर केले.
ठाण्यातील नगरसेवक हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांच्या छळाला कंटाळून सुरज परमार यांनी आत्महत्या केलीये असा आरोप या नगरसेवकांवर आहे.
ठाण्यातल्या चारही नगरसेवकांना दिलासा
ठाण्याचा बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी ठाण्यातल्या चारही नगरसेवकांना दिलासा मिळालाय. चारही नगरसेवकांचा शरणागतीचा अर्ज मुंबई हाय कोर्टानं मंजूर केलाय. चौघांनाही तपास पथकासमोर हजर राहण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. त्यासाठी या चौघांना शनिवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
तत्पूर्वी या प्रकरणाचं गांभीर्य आणि गंभीर आरोप पाहता अर्जदारांना अटकेपासून संरक्षण देणे उचित वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी चारही नगरसेवकांचे अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.