जळगाव : जिल्ह्यात कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि एरंडोलचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचं नाव घ्यायला ते काही शांताबाई नाहीत आणि मी शांताराम नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा )
तर आपल्यावर गुलाबराव पाटील हे मंत्रिपद मिळवण्यासाठी टीका करतात, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय, यावर गुलाबराव पाटील यांनी खरपूस समाचार घेतं म्हटलंय, एकनाथराव खडसे मला मंत्रिपद देणार नाहीत, तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे देणारे आहेत.
एकनाथ खडसे यांनी आधी आपलं मंत्रिपद व्यवस्थित पाहावं, असा सल्लाही गुलाबराव यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.
पाहा व्हिडीओ खडसे, गुलाबराव जुंगलबंदी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.