CCTV फुटेज : राँग साईडनं बाईकवर 'धूम स्टाईल', तरुणीला उडवलं

बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय

Updated: Jan 15, 2016, 07:49 PM IST

औरंगाबाद : बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय. 

विरूद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकीनं एका युवतीला उडवलंय. ही घटना किलेअर्क इथं घडली असून हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. 

अपघातात मोक्षाली निकम गंभीर जखमी झालीये. राँग साईडनं वेगानं बाईक चालवणारा शेख अरबाज हादेखील गंभीर जखमी आहे. त्याच्याविरोधात बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.