भाजप मंत्र्याच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट

गाड्यांवरच्या फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. पण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं आहे. 

Updated: Feb 7, 2016, 04:24 PM IST
भाजप मंत्र्याच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट title=

सोलापूर: गाड्यांवरच्या फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. पण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं आहे. 

सोलापूर दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या गाडीवर भाजप लिहीलेली नंबर प्लेट आढळून आली आहे. या कारचा नंबर एमएच 13 सीएफ 8110 असा होता. हा क्रमांक BJP भासावा अशा पद्धतीनं लिहीलेला होता.

या ठिकाणी पोलीस असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे कायदा आणि नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू होतात का ? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.

 

दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश रावते यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.