नवी मुंबई : एक अत्यंत धक्कादायक बातमी. अल्पवयीन मुलींना चक्क गुंगीचं औषध देवून पळवून नेणं आणि पळवून नेलेल्या या मुलींना आग्रा इथे वेश्या व्यावसाय करण्यासाठी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलय.
आग्र्याहून आपली सुटका करून नवी मुंबईत दाखल झालेल्या मुलीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. आग्र्यातील कश्मीरी बाजार भागातील कुंटणखाण्यावर धाडी टाकून २१ मुलींची या नरकयातनेतून सुटका पोलिसांनी केली.
२००७ साली नवी मुंबईतल्या एका १२ वर्षांच्या मुलीचं असच अपहरण करण्यात आलं होत आणि तिला आग्रा इथल्या कश्मीरी बाजारातील कुंटणखाण्यात विकण्यात आलं होत. या नरकयातनेतून स्वत:ची सुटका करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मुलीने गिऱ्हाईकाच्या मदतीने नवी मुंबई गाठली आणि आग्र्यामध्ये चालत असलेला प्रकार नेरूळ पोलीस ठाण्यात सांगितला. या मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारेच नवी मुंबई पोलीसांनी आग्रा पोलिसांसह कश्मीरी बाजार भागातील कुंटणखाण्यांवर छापा टाकत २१ मुंलीची सुटका केली.
सुटका करण्यात आलेल्या मुलींपैकी ५ मुली या महाराष्ट्रातील तर इतर मुली परराज्यातल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या परविन खान दलाल श्रीमान तामन, सुभाष चंद, जेन लोन या चार जणांना अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.